Ad will apear here
Next
पर्यावरणदिनी मेघालय करणार १५ लाख झाडे लावण्याचा विक्रम
शिलॉंग : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाच जून रोजी मेघालय राज्यात तब्बल १५ लाख झाडे लावण्याचा विक्रम केला जाणार आहे. एक नागरिक एक झाड या मोहिमेचा शुभारंभ त्या दिवशी होणार असून, राज्यात ३०६ ठिकाणी तब्बल दहा लाख झाडे लावण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने भारतीय वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.   

राज्यातील मृदा आणि जलसंवर्धन विभागातर्फे ही मोहीम हाती घेण्यात आली असून, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने यासाठी निधी उपलब्ध केला आहे. मेघालयमधील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार असून, यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला एक झाड देण्यात येणार आहे. दहा गावांचा एक ब्लॉक या प्रमाणे ४६ भागांमध्ये प्रत्येकी एक हजार झाडे लावण्यात येणार आहेत. याद्वारे चार लाख ६० हजार झाडांची लागवड होईल. यासाठी लागणारी रोपे स्थानिक पातळीवरील नर्सरीमध्ये तयार करण्यात आली आहेत. उमीऊ आणि गनोल क्षेत्रात हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. 

शिलॉंग-तुरा आदी राष्ट्रीय महामार्गांच्या बाजूलाही वेगवेगळे वृक्ष लावण्याचे नियोजन आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शंभर शाळांना सहभागी करण्याचेही उद्दिष्ट आहे. या सामूहिक वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी समाजमाध्यमांद्वारे नावनोंदणी करण्यात येत आहे. सहभागी नागरिकांना झाडे लावण्यासाठी आवश्यक ते सर्व साहित्य देण्यात येणार आहे. तसेच किमान दोन वर्षे हे झाड जगवले, तर विशेष सवलतही देण्यात येणार आहे. 

हैदराबादमध्ये पाच किलोमीटरची दौड 
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हैदराबादमध्ये पाच किलोमीटर अंतराच्या दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. उमर अलिशा ग्रामीण विकास ट्रस्ट आणि श्री विश्व विजनना अध्यात्मिक पिठाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पीठापुरम भागात नेकलेस रोडवर सकाळी सात ते नऊ या वेळेत ही फेरी होईल. यात सहभागी होण्यासाठी शंभर रुपये शुल्क आहे,’ अशी माहिती अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली.

हेही जरूर वाचा :

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZYGCB
Similar Posts
ठाणेकरांना मोबाइलवर पाहता येणार हवेची गुणवत्ता ठाणे : ठाणे महानगरपालिकेद्वारे पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचा कार्यक्रम पालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्याने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेद्वारे हवा गुणवत्तान तपासण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या अॅपचे लोकार्पण महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले
पर्यावरण दिनानिमित्त जुईचे आगळेवेगळे फॅमिली गेट-टुगेदर कर्जत (रायगड) : आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या वसुंधरेचे जतन आपण स्वतः करायचे असते याची जाण ठेवून सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी हिने नुकत्याच पार पडलेल्या जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून कर्जत येथे वृक्षारोपण केले. प्राणिप्रेमासाठी प्रसिद्ध असणारी जुई पर्यावरणप्रेमीदेखीलआहे याचा प्रत्यय या निमित्ताने आला
ठाणेकरांना मोबाइलवर पाहता येणार हवेची गुणवत्ताप ठाणे : ठाणे महानगरपालिकेद्वारे पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचा कार्यक्रम पालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्याने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेद्वारे हवा गुणवत्तान तपासण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या अॅपचे लोकार्पण महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले
पर्यावरणदिनी पेट्रोल पंपाच्या मालकाने केले ५०० रोपांचे वाटप रत्नागिरी : जागतिक पर्यावरण दिनी (पाच जून) रत्नागिरीतील उद्योजक कॅ. कोमल सिंग यांनी त्यांच्या अद्वैत पेट्रोल पंपावर आलेल्या ५०० ग्राहकांना एक झाड भेट दिले. ‘दर वर्षी मी एक झाड लावून ते जगवीन,’ अशी प्रतिज्ञा ग्राहकांकडून लिहून देऊन त्याखाली त्यांची स्वाक्षरीसुद्धा घेतली. गेली काही वर्षे ते हा विधायक उपक्रम

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language